eknath shinde, amit shaha, devendra fadnavis,

एकनाथ शिंदे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यात अहमदाबादमध्ये सायंकाळी बैठक, शरद पवारांनीही घेतली पत्रकार परिषद… म्हणाले….

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

बीड, दि.21: बंडानंतर मंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता होती. मात्र ही पत्रकार परिषद कधी होणार याबाबत काहीच स्पषटता नाही. मात्र आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे की दिल्लीला गेलेले देवेंद्र फडणवीस आता गुजरातच्या अहमदाबादला जात आहेत. त्यांच्यासोबत अमित शहा देखील असणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी आपले विश्वासू दूत मिलिंद नॉर्वेकर यांना सुरतच्या दिशेने रवाना केले आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याची महाराष्ट्राला आता उत्सुकता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत काडीमोड घ्या, असा निरोप मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची चर्चा आहे. तर इकडे भाजपा त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या इतर आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करेल. जर पक्षांतर बंदी कायदा लागू झाला तर या सर्व आमदारांना राजीनामे देऊन पुन्हा निवडून आणण्याची तयारी करून पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याचा डाव टाकत असल्याचे दिसत आहे. इकडे उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात माजी वनमंत्री संजय राठोड मध्यस्थी करीत असल्याची माहिती आहे. ते देखील मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन सुरतकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

शरद पवार काय म्हणाले…
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले, ठाकरे सरकार ठिक चालंलय, महाराष्ट्रात अशाप्रकारे तीनदा झालंय. मागच्या आडीच वर्षापासून सरकार पाडण्याचे सतत प्रयत्न सुरु आहेत. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवून दाखवू, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री पदावर कुणाला संधी द्यायची हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या संकटाच्यावेळी आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. या सत्तापेचातून तोडगा निघेल. एकनाथ शिंदे यांचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना त्यावर अंतर्गत चर्चा करू द्या. आम्ही त्यानंतर या प्रश्नावर शिवसेनेशी चर्चा करू, त्यानंतरच आम्ही या प्रश्नावर बोलू असेही पवार म्हणाले.

दुसरीकडे भाजपचे आमदार संजय कुटे हे सुरतला हॉटेल डी मेरियटमध्ये पोहोचले असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. काल मतदान झाल्यानंतर पालघर जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरून गुजरात पोलीसांच्या संरक्षणात एकनाथ शिंदे यांचे आमदार हॉटेल डी मेरियटमध्ये पोहोचले. त्यामुळे आता हे ऑपरेशन लोटस असून ते दिल्लीतूनच हलविण्यात येत असल्याचे समजत आहे.

Tagged