पाणी भरताना विद्यूत मोटारीचा करंट बसल्याने तरुणाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव


किट्टी आडगाव दि.18 : नळाला आलेले पाणी विद्यूत मोटारीच्या सहाय्याने भरत असताना मोटारीत विद्यूत प्रवाह उतरल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे सोमवारी (दि.17) सायंकाळी घडली.

मच्छिंद्र मोतीराम काठुळे (वय 28) असे मयताचे नाव आहे. मच्छिंद्र यांनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी नळाला विद्यूत मोटार जोडली. मात्र मोटारीत विद्यूत प्रवाह उतरल्याने त्यांना करंट बसल्याने जागीच मृत्यू झाला. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Tagged