नेकनूर शाखेत सात कोटींच्या ठेवी
नेकनूर दि.18 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटने (jijau mahsaheb multisate bank) ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल आहे, याचा तपास सुरु असतानाच नेकनूर पोलीस ठाण्यातही तेथील शाखेतून फसवणूक झाल्याप्रकरणी मंगळवारी (दि.18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील ठेवींचा आकडा हा पावणे सात कोटींचा आहे. तक्रारी वाढल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
15 वर्षापासून नेकनूर येथे जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेची शाखा आहे. या शाखेत कष्टकरी मुजरापासून ते नोकरदार, व्यापारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात जोडला गेला होता. मात्र बँकेच्या अध्यक्षा अनिता बबनराव शिंदे यांनी या ठिकाणी येऊन ठेवीदारांना धीर देत लवकर पैसे देण्याचे आश्वासन दिले. तारीख पे तारीख देण्यात आली. मात्र एकाही ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही. त्यात बीडमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतरही नेकनूर येथील ठेवीदारांनी पैसे मिळतील अशी अपेक्षा ठेवून वाट पाहिली. अखेर मंगळवारी 250 तक्रारदारांनी कागदपत्रे देत पावणे सात कोटीची फसवणूक झाल्याप्रकरणी किशोर काळे यांच्या फिर्यादीवरुन बबनराव शिंदे, (babanrao shinde) मनीष बबनराव शिंदे, (manish babanrao shinde) अश्विनी मनीष शिंदे, योगेश करांडे, मधुकर वाघिरे व संचालक मंडळ यांच्यावर नेकनूर पोलीसात कलम 406, 409, 420, 120-इ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास हजारे, पोह.गोविंद राख हे करत आहेत. (neknoor police station)