जिजाऊ मॉं साहेब बँक घोटाळा; ठेवीदारांचा आक्रोश मोर्चा

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीडमध्ये शेकडो ठेवीदार रस्त्यावर

बीड : शहरातील जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेट बँकेचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उजेडात आला आहे. या घोटाळ्यात पोलिसांनी गतीने तपास करावा, आरोपींची नार्को टेस्ट करा, फरार आरोपींना अटक करा, या मागण्यासाठी येथील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (दि.१९) आक्रोश मोर्चा काढला आहे.

शहरातील जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेट बँकेत जादा व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी बीडपाठोपाठ नेकनुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी तब्बल १२०० हून अधिक ठेवीदारांचे जवाब नोंदविले आहेत. या घोटाळ्याचा पोलिसांनी गतीने तपास करावा, ठेवी मिळवून द्याव्यात, या मागणीसाठी ठेवीदरांनी आज सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो ठेवीदार सहभागी झाले आहेत. या मोर्चाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष ॲड. अप्पासाहेब जगताप यांनी केले. या मोर्चा शेकडो ठेवीदार सहभागी झाले आहेत. प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Tagged