उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटलांवर ‘संक्रांत’

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

शासनाकडून निलंबनाचे आदेश

बीड : जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करणारे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्यावर संक्रांत आली असून त्यांच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने आज (दि.14) काढले आहेत.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील भु-सूधारचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी अनेक जमिनी खालसा केल्याच्या तक्रारींचा पाऊस झाला होता. त्यामुळे चौकशी करण्यात येत होती. त्यांच्यावर आष्टीत 3 तर बीडमध्ये 1 गुन्हे देखील दाखल झाला होता. तत्पूर्वी त्यांची बदली करण्यात आलेली होती. परंतु त्यांनी मध्यंतरी बीडला रूजू होण्याचा प्रयत्न केला, असता जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना रूजू करून घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. या सर्व घडामोडीनंतर अखेर प्रकाश आघाव पाटील यांच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने काढले असून त्यांच्यावर जमीन खालसा प्रकरणात प्रकाश आघाव यांनी अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Tagged