corona pecaint suicide

क्वारंटाईन तरुणाने घेतला गळफास

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

गेवराई तालुक्यातील घटना

गेवराई : तालुक्यातील चकलांबा जवळील बाभळदरा तांडा येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे कोरंटाईन असलेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

     गेवराई शहरातील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्य तुकाराम जगन्नाथ जाधव (वय 35 रा.बाभळदरा तांडा चकलांबा) याला गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये कोरंटाईन करण्यात आले होते. त्याचा स्वाब शुक्रवारी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने क्वरंटाईन सेंटरमधील पंख्याला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यावेळी तेथील न.प.कर्मचारी त्याचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले असता न उघडल्याने कर्मचार्‍यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती कर्मचार्‍यांने देताच गेवराई पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम चोबे, फौजदार सुनील ऐटवार, विशाल प्रधान, राजू वाघमारे,आरोग्य विभागाचे डॉ.मुकेश कुचेरिया, तलाठी राजेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Tagged