देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केल्यानंतर त्यांच्या या दिल्ली दौर्‍याची चर्चा आहे

नवी दिल्ली ः महाराष्ट्रात देशातील राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. दौरा संपल्यानंतर त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचा आढावा सादर केला. दरम्यान, फडणवीस आज भाजपच्या इतर नेत्यांसह दिल्ली दौर्‍यावर आहेत.

मध्यप्रदेश, राजस्थान नंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी याबाबत वक्तव्य देखील केले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौर्‍याचा दुसरा अर्थ देखील लावण्यात येत आहे. दिल्लीत फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे केली.

फडणवीसांसमवेत सातार्‍यातील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आहेत. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट देवेंद्र फडणवीस घेणार असून साखर कारखाने संकटात असल्याने मदतीची मागणी ते करणार आहेत.

Tagged