‘फोटो लेते रहो’…अमृता फडणवीस ट्रोल

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई : माजी मुख्यमंत्री former cheif minister व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devdendra phadanvis यांच्या पत्नी अमृता फडणवीस amruta phadanvis या एका कार्यशाळेदरम्यान सहभागी झाल्या असताना टेबलवरील एका कागदावर लिहून ठेवलेल्या एका वाक्यामुळं त्या ट्रोल होत आहेत.

    त्यांचं झालं असं, नागपूरच्या nagur एका संस्थेने आरोग्यविषयक वेबिनार webinar आयोजित केलं होतं. अमृता फडणवीस या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हस्ते कम्युनिटी हेल्थ सर्व्हिसेस 2019-20 हा व्हिडिओ जारी करण्यात आला. तसंच, त्यांनी डॉक्टरांशी संवादही साधला. अमृता यांनी स्वत:च या संदर्भातील पोस्ट फेसबुक व ट्विटरवर शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता फडणवीस वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत. त्यांच्या बाजूलाच एक कोरा कागद दिसत असून त्यावर पुसटसं काहीतरी लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो झूम करून पाहिल्यानंतर त्यावर ‘फोटो लेते रहो’ हे तीन शब्द दिसतात. त्यांचा हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
Read karyarambh E-PAPER

Tagged