पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेतततळ्यात बुडून मृत्यू

क्राईम बीड

लिंबागणेश येथील घटना


नेकनूर :  पाणी आणण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लिंबागणेश येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.     

       उषा संदिप गिरे (वय 29 रा.गिरेवस्ती, लिंबागणेश ता.बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळी शेततळ्यावरुन पाणी आणते असे पती संदिप रमेश गिरे यांना सांगून गेल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत त्या घरी न आल्यामुळे पतीने त्यांची शोधाशोध सुरु केली. पाऊस सुरु असल्यामुळे कुणाच्यातरी घरी थांबली असेल असे पतीला वाटले. परंतु खुप वेळानंतरही न परतल्यामुळे शेततळ्याकडे जावून पहिले असता शेततळ्यवर मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलिस चौकीतील कर्मचारी यांनी स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. गुुरुवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती रकटे यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास नेकनूरचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. उषा यांच्या पश्चात पती संदिप गिरे व दोन लहान मुले, सार्थक वय 7 वर्षे आणि संस्कार वय 4 वर्षे असा परीवार असुन त्यांचे माहेर गेवराई तालुक्यातील मौजे पिंपळा (कानडा) येथील आहे. या घटेनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Tagged