CORONA

बीड जिल्ह्यातील आजचे रुग्ण कुठले?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड,दि. 8 : बीड जिल्हा आजच्या आकड्याने पुरता हादरून गेला आहे. बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीने सर्वांच्याच मनात धडकी भरली. एकाच दिवसात तब्बल 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतचा हा आकडा सर्वाधिक आहे.

मंगळवारी बीड जिल्ह्यात 13 जण एकाचवेळी पॉझिटीव्ह आढळून आले होते. आज पुन्हा 17 जण पॉझिटीव्ह आढळले. आज आढळलेल्या रुग्णांमध्य बीड, अंबाजोगाई, गेवराई, परळी तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

आज प्रशासनाने उशीरा दिलेल्या माहितीनुसार पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई शहरातील शिक्षक कॉलनीतील (मोरेवाडी) 36 वर्षीय महिला, 15 व 13 वर्षीय मुलाचा समावेश आहे.

परळी येथील 45 व 33 वर्षीय पुरुष (एसबीआय बँक कर्मचारी परळी), 71 वर्षीय पुरुष व 7 वर्षीय बालक (एसबीआय बँक कर्मचारी यांचे कुटुंब), तर 46, 23 वर्षीय पुरुष (बँकेचे ग्राहक रा.परळी शहर व दादाहरी वडगाव) यांचा समावेश आहे.

गेवराई येथील 26 वर्षीय महिला शहरातील इस्लामपुरा येथील पुर्वीच्या बाधीताच्या संपर्कात आलेली होती. तर 28 वर्षीय पुरुष हा केकत पांगरी येथील असून तो पुणे येथून आलेला आहे.
बीड शहरातील परवाना नगर येथील 68 वर्षीय पुरुष, मोमीन पुरा, मक्का चौक येथील 43 वर्षीय पुरुष, विद्यानगर पुर्व येथील 30 वर्षीय पुरुष, गोविंदनगर येथील 82 वर्षीय महिला, तर बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथील 55 वर्षीय पुरुष, व वंजारवाडी येथील 30 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

बीड तालुक्यातील सहा पैकी 3 रुग्ण हे बीड शहरात केलेल्या मेगा सर्वेक्षणात आढळून आले आहेत.

अशी आहे आकडेवारी

8 जुलैपर्यंतची रुग्णांची नोंद – 193
मयत रुग्ण 07
बरे झालेले रुग्ण 123
उपचार सुरु असलेले 63

संबधित बातमी वाचा

बीड जिल्ह्यात पुन्हा 17 पॉझिटीव्ह