DEVENDRA FADANVIS

Devendra fadnavis accident:देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

महाराष्ट्र

जळगाव दि. 8 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला जळगाव येथे अपघात झाल्याचे वृत्त आहे. जळगावजवळ महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही ईजा झालेली नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. नाशिक जिल्ह्याचा दौरा आटोपून ते भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आज रात्री यावल तालुक्यातील भालोद येथे निघाले होते. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ मुसळधार पावसामुळे त्यांच्या ताफ्यातील एका वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे नियंत्रण सुटलेले वाहन पुढील वाहनाला धडकले. या वाहनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेक PRAVIN DAREKAR बसलेले होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातानंतर प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत बसून पुढील प्रवासाला निघाले.

खा.शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

Tagged