ajit pawar and denendra fadnvis

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट!

दोन वेळा भाजप-राष्ट्रवादीच्या बैठका झाल्याचा फडणवीसांचा दावा

‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट!

 बीड : भाजपा-शिवसेना सत्तास्थापनेत नेमक्या काय अडचणी आल्या याबाबतचा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘शिवसेना आमच्यासोबत येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून आम्हाला थेट ऑफर आली होती. खुद्द पक्ष प्रमुखांकरवीच ही ऑफर होती, असे एक अनेक गौप्यस्फोट फडणवीसांनी केले. राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी घेतलेल्या ‘द इनसायडर’ या ऑनलाइन मुलाखतीत फडणवीसांनी या पडद्यामागच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, भाजपा आणि राष्ट्रवादीत जेव्हा बैठका सुरु होत्या त्यातील एका बैठकीला मी होतो तर एका बैठकीला मी नव्हतो. ही सगळी चर्चा मला माहीत होती. मात्र नंतर अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी भूमिका बदलली आणि आम्हाला कॉर्नर केले गेले. मग मध्ये दोन-तीन दिवस गेले. काहीच हालचाली झाल्या नाहीत आणि अचानक अजित पवारांकडून आमच्यापुढे प्रस्ताव आला. ‘तीन पक्षांचं सरकार बनवणं मला मान्य नाही. भाजप व राष्ट्रवादीच राज्याला स्थिर सरकार देऊ शकतात. आपल्याकडे स्ट्रेंथही आहे. माझी सरकार बनवायला काहीच हरकत नाही’, असा शरद पवारांचा निरोप होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याविरोधात गेला नसता तर आमचं सरकार शंभर टक्के टिकलं असतं, असा दावाही फडणवीस यांनी केला.

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय
चुकलाच पण त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता

एका रात्रीतून सरकार बनवण्याबाबत फडणवीस म्हणाले, तुम्हाला फसवलं जातं, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा तुम्हाला जशास तसं उत्तर द्यावंच लागतं. त्यामुळेच गनिमी कावा खेळावा लागला. त्यातूनच रात्री सरकार स्थापन करायचं ठरलं आणि सकाळीच ठरल्याप्रमाणे सारं घडवूनही आणलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सारे चित्र पालटले. आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपला निर्णय तेव्हा चुकला असे नक्की वाटते पण तेव्हा दुसरा पर्यायही नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिलाच नव्हता

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप नेतृत्वाने वचन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणत होते मात्र मला तरी तसं पक्षाकडून सांगण्यात आलं नव्हतं. मी तशी तेव्हाचे आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे विचारणाही केली होती. त्यांनीही असा कोणताही शब्द दिला नसल्याचे मला सांगितले. केवळ 50-50 टक्के जागा हे सूत्र ठरलं होतं आणि त्याबाबत मी पत्रकार परिषदेत घोषणा केली होती, असे फडणवीस म्हणाले. शिवसेना-भाजपमधील तणाव निश्चित निवळला असता मात्र उद्धव ठाकरेंनी नंतर बोलणंच टाळलं. ते फोनही घेत नव्हते. त्याआधी पाच वर्षांत असं कधीच झालं नाही. माझ्याशी साधं फोनवर बोलण्यासही ते तयार नाहीत, याचे मला जास्त दु:ख झाले, अशी सल फडणवीस यांनी बोलून दाखवली.

पुस्तक लिहीणार

त्या संपूर्ण राजकीय घडामोडी कशा घडत गेल्या तो घटनाक्रम माझ्या डोक्यात फिट्ट बसलेल्या आहेत. त्यात काहीच विसरता येण्यासारखं नाही. आजपर्यंत गूढ बनून राहिलेल्या गोष्टींचा उलगडा त्यात केला आहे. त्यातही येत्या काळात पडद्यामागे नेमकं काय घडलं, याची ‘आपबीती’ पुस्तकाच्या रूपाने मांडण्याचा मनोदयही फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे.

Tagged

Comments are closed.