अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलेनियाही कोरोनाबाधित

न्यूज ऑफ द डे बीड

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे.

   डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत. दरम्यान, अमेरिकेसारख्या सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली असून जगाचे लक्ष वेधलं आहे.

Tagged