राहूल गांधींना धक्काबुक्की; महाराष्ट्रात तीव्र पडसाद

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

बीड ः हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाणार्‍या काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. या दडपशाहीच्या विरोधात भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी यमुना एक्स्प्रेस वेवरुन पायी निघाले होते. यावेळी राहुल गांधींना पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच, कलम 144 लागू असल्यामुळे पुढे जाता येणार नाही असे सांगून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अटक करून पोलिसांनी सुटका केली आहे. या घटनेचे समाजमाध्यमांवर तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यूपी पोलिसांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरु केले आहे.

Tagged