एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

पगाराबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती


मुंबई : एसटी कर्मचार्‍यांसाठी मोठी आंनदाची बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे. 
        तीन महिन्याचे वेतन थकीत झाल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आझाद मैदानात दोन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने कर्मचार्‍यांनी आणि एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. जर आम्हाला पगार मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करु आणि राज्य सरकारला न्यायालयात खेचू असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला होता. पगार न झाल्याने एसटी महामंडळाचे एक लाखापेक्षा जास्त कामगार 7 ऑक्टोबरपासून आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. त्याची दखल न घेतल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल असेही त्यांनी म्हटले.

Tagged