जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी कारखान्यास जाणार्‍या गाड्या फोडल्या

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : ऊसतोड कामगारांच्या न्याय मागण्यासाठी बीडचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना साकडे घालून मैदानात उतरवलं. त्यांनी आवाहन केल्यानंतरही संपात फुट पाडण्याचा प्रयत्न करत काही गाड्या कारखान्याकडे निघाल्या होत्या. आंबेडकरांचा शब्द मोडल्याचा आरोप करत प्रा.बांगर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आक्रमक होत धारूर येथील घाटात मध्यरात्री मजूरांना मारहाण करत गाड्या फोडल्या आहेत.

ऊसतोड कामगार संपावरून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. आंबेकडकरांचा शब्द मोडून कारखान्याला जाणार्‍या मजुरांना अडवून अमानुष मारहाण केली. तसेच, मजुरांच्या गाड्याचीही तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. मजुरांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांच्यासह अन्य पदाधिकारी दिसत आहेत. बांगर यांनी गाडीच्या काचा फोडल्या असून एकास मारहाण देखील केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऊसतोड कामगारांच्या न्याय मागण्यासाठी संप सुरु असून यंदा वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली आहे. ऊसतोड मजूरांच्या प्रश्नावरून आता संप आणि राजकारण देखील जोरात सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

Tagged