rakhi

राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड : राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 (सोमवारी) असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट रविवारी रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयामध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. प्राधान्य क्रमाने व वेळेत राखी टपाल वितरण करण्यासाठी लोक स्पीड पोस्ट सेवा वापरु शकतात, असे आवाहन डाक विभाग बीड यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

   राखी हा सण भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा उत्सव आहे. ज्यात भावनिक  भावनिक असक्ती आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत. राखी टपालाची प्रधान्य क्रमानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफीसमध्ये करण्यात आली असून राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरु करण्यात आले आहेत. यावर्षी हा सण अधिक महत्व गृहीत धरत आहे. कारण त्यांची शहरात राहणार्‍या भावडांना विविध निर्बंधामुळे सणासाठी भेट घेता येणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंटेनमेंट झोन किंवा सीलबंद इमारतीमध्ये राहत असतील या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्रधान्य दिले आहे. तसेच स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल, अशी घोषणा देऊन आनंद मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.