सिंदफना नदीत आढळला कुजलेला मृतदेह

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड  दि.12 : सिंदफना नदीपात्रातील एका झाडावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.
शिरुर तालुक्यातील हाजीपूर परिसरामध्ये सिंदफना नदीतपात्रात झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह चकलांबा पोलीसांना आढळून आला. या प्रकरणी चकलांबा पोलीसांनी तपास केल्यानंतर शिरुर पोलीस ठाण्यामध्ये मिसींग दाखल आहे. अतिवृष्टीमध्ये पुरात एक इसम वाहून गेला होता. हा मृतदेह त्याचाच असल्याचा संशय पोलीसांना आला. संबधित नातेवाईकांना बोलावून घेतले असून मृतदेहाची ओळख पटलेली असल्याचे चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि.विजय देशमुख यांनी सांगितले. मोहन विठ्ठल अवंतकर (वय 85 रा.नांदवकी ता.शिरुर) असे इसमाचे नाव आहे. पुढील तपास पोउपनि.डिगांबर पवार हे करत आहेत.

Tagged