ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून रस्त्यात अंगणवाडी सेविकेची साडी ओढली!

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड


बीड दि.21 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकाला अंगणवाडीकडे जात असताना बुधवारी (21) तिघांनी साडी ओढली, व छेड काढली. पीडित महिलेने थेट पाटोदा पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाटोदा तालुक्यातील पिठी नायगाव परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका अंगणवाडी सेविकेला रस्त्याने जात असताना येथीलच राजेंद्र जगन्नाथ भोंडवे, नितीन राजेंद्र भोंडवे, सचिन राजेंद्र भोंडवे यांनी वाद घालत अंगावरील साडी ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी पिढीने पाटोदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हा प्रकार घडलेला असून पिडीतेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-रामचंद्र पवार
सहायक निरीक्षक, पाटोदा

Tagged