corona virus image

कोरोनामुक्त झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या खास सुचना

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे


मुंबई, दि.13 : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडे आता आरोग्य मंत्रालयाने लक्ष केंद्रीत केले आहे. अशा व्यक्तीसाठी केंद्राने खास सुचना जारी केल्या आहेत. भारतात 37 लाख 2 हजार रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झालेले आहेत. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजार भेडसावत आहेत. ही बाब आरोग्य विभागाने गंभीरपणे घेतली आहे.


देशात करोनामुक्त होणार्‍याचं प्रमाण वाढत असले तरी अनेकांना आरोग्याच्या समस्या दिसत आहेत. अशक्तपणा किंवा शरिराचा एखादा भाग खराब होणं यासारख्या समस्या करोनामुक्त होणार्‍या बर्‍याच रुग्णांमध्ये दिसत आहेत. या समस्यांना समोर ठेवून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं करोनामुक्त झालेल्यांसाठी काही सुचना आणि उपाय सुचवले आहेत.
कोरोना मुक्त झालेल्यांनी अशी घ्यावी काळजी

  • नियमित मॉर्निंग वॉकला किंवा सायंकाळी चालायला जावं.
  • दररोज योग अभ्यासही करावा.
  • करोनामुक्त झालेल्यांनी नियमित चवनप्राश, हळदीचे दुध, गिलोय पाउडर, अश्वगंधासारख्या रोगप्रतिराकशक्ती वाढवणार्‍या पदार्थांचा समावेश करावा.
  • दररोज सकाळी कोमट पाण्यानं गुळणी भरावी आणि गरम पाण्याची वाफ घ्यावी.
  • सहज पचेल अशा संतुलित अन्नाचं सेवन करावं.
  • स्वास्थ्य मंत्रालयाच्या सुचनेमध्ये करोनामुक्त झालेल्यांना आयुष औषधं घेण्यासही सांगितली आहेत. ही औषधं फक्त रजिस्टर्ड डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळतील.
  • ज्यांचा घसा खरखर करतो त्यांनी नियमित कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
  • करोनामुक्त झालेल्यांनी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचं पालन करावं.
  • नियमित कोमट पाण्याचं सेवन करावं. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या पदार्थांचं नियमित सेवन करावं.
Tagged