अखेर अंबासाखर कारखाना सुरू होणार

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

शुक्रवारी बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

अंबाजोगाई : केज मतदारसंघातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागून असलेला अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना अखेर सुरू होणार हे आता स्पष्ट झाले आहे. येत्या शुक्रवारी (दि.७) दुपारी १ वाजता बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ पार पडणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२०२२ गळीत हंगाम सुरू झाला नव्हता. त्यामुळे केज मतदारसंघातील ऊस गाळपास वंचित राहील अशी भीती व्यक्त केली जात होती. अशात बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ निश्चित झाल्याने शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष हे कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर हे असणार आहेत. तर वरपगाव येथील साधू शिवरामपुरी मठसंस्थानाचे मठाधीपती ह.भ.प. महंत भगवान महाराज वरपगावकर यांच्या हस्ते शुभारंभ होईल. या कार्यक्रमास कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन हनमंतराव मोरे, कार्यकारी संचालक सुरेश साखरे यांच्यासह संचालकांनी केले आहे.

शेतकर्‍यांना मिळाला दिलासा
कारखान्याचा शुक्रवारी बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ असला तरी तांत्रिक कामकाज पूर्ण करूनच १५ तारखेपर्यंत प्रत्यक्ष गाळप सुरु होईल, अशी माहिती चेअरमन रमेश आडसकर यांनी दिली. दरम्यान, कारखाना सुरु होणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Tagged