अन् मुख्य सचिवांच्या दौर्‍यावर पत्रकारांनी घातला बहिष्कार

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

पैठण : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्या येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी दौर्‍याचे वृत्तसंकलन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी प्रवेश नाकारला. याच्या निषेधार्थ पैठण पत्रकारांनी वृत्तसंकलनवर निषेध करून बहिष्कार टाकण्यात आला असून संबंधित बेजबाबदार अधिकार्‍यांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

मुख्य सचिव संजयकुमार यांच्या पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी दौरा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने प्रसार माध्यमाचे विविध प्रतिनिधीने संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये मुख्य सचिव यांच्या आगमनापूर्वी वृत्त संकलनासाठी उद्यानामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी संबंधित कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पत्रकारांना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात प्रवेश देऊ नका असे सुरक्षा रक्षकाला आदेश दिल्यामुळे संतप्त झालेल्या विविध प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीने तात्काळ संबंधित अधिकार्‍याचा निषेध व्यक्त केला. मुख्य सचिव यांच्या दौर्‍याचे वृत्तसंकलन करण्यावर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केल्यामुळे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी पत्रकारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पत्रकारांची झालेल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पत्रकारांनी सदरील कार्यक्रमाच्या वृत्तसंकलनावर बहिष्कार कायम ठेवून तातडीने पत्रकार संघाची बैठक घेतली. बेजबाबदार अधिकार्‍याविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शिष्टमंडळाद्वारे जाऊन निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरवले आहे. यावेळी दोन्ही पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे, नानक वेदी, ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव, बद्रीनाथ खंडागळे, चंद्रकांत तारू, चंद्रकांत अंबिलवादे, शकील खलिफा गौतम बनकर, मोहन ठाकूर, नंदकुमार चव्हाण, मनोज परदेशी, मूफिद पठाण, रमेश शेळके, मंगलसिंग भवरे, चंदन लक्कडहार, सोमनाथ शिंदे, दादा गलांडे, दादा घोडके, बाळू आहेर, सुरेश सुरेश वायभट, बाबा अडसूळ, राहुल पगारे, ज्ञानेश्वर बावणे, विजय खडसन उपस्थित होते.

Tagged