नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

बीड : राज्यात होऊ घातलेल्या 105 नगरपंचायतींमध्ये बीड जिल्ह्यात 5 नगरपंचायींचा समावेश आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर करण्यात आल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी केली आहे.

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणीसह केज नगरपंचायतींच्या प्रभागरचनेसह आरक्षण सोडतीची प्रकीया नुकतीच पार पडली. आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संपूर्ण संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकार्‍यांना इतरत्रसुध्दा करता येणार नाही, आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
प्रभागनिहाय यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक – 21-11-2021
जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याचा दिनांक- 30-11-2021
नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्याचा कालावधी 1-12-2021 ते 7-12-2021
छाननी कालावधी – 8-12-02021
मागे घेण्याचा कालावधी 13-12-2021
अपिलाचा निर्णय देण्याची तारीख 16-12-2021
उमेदवारी मागे घेण्याचा तारीख 13-12-2021
चिन्ह वाटप- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशी लगेच
मतदानाचा दिनांक- 21-12-2021
मतमोजणी 22-12-2021

Tagged