देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटली; 1321 नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

देशातील कोरोना संसर्ग घटला असला, तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. एकीकडे कोरोना संसर्गात घट होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. बदलत्या वातावरणामुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती आणि कोरोनाच्या सबव्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य आकडेवारीनुसार, देशात देशात एक हजार 321 नवीन रुग्ण आणि नऊ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात 1321 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबतच देशातील कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या चार कोटी 46 लाख 57 हजार 149 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात 5 लाख 30 हजार 461 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 16 हजार 98 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

Tagged