सोनिया गांधींचे विश्वासू अहमद पटेल यांच्या घरी ’ईडी’चे पथक

देश विदेश न्यूज ऑफ द डे राजकारण

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरी संदेसरा समूहाच्या 5000 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे पथक अचानक धडकले. आज सकाळी ’ईडी’च्या तीन अधिकार्‍यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या ’ईडी’च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. आधीच’ईडी’कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी करण्यात आली. यानंतर ’ईडी’कडून अहमद पटेल यांनादेखील चौकशीचे कारण देऊन बोलवण्यात आले.

मात्र, मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे सरकारी नियमावलीनुसार मी चौकशीसाठी येऊ शकत नाही असेे अहमद पटेल यांनी ’ईडी’ला कळवलेे. त्यांच्याकडून होणारी टाळाटाळ पाहून आता ’ईडी’कडूनच पथक त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेे.

काय आहे नेमके प्रकरण?
स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातमधील कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तब्बल 14500 कोटींच्या या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण फरार आहेत. अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. म्हणून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Tagged