india vs china

भारतीय राजदुतानेे चीनला सुनावले खडे बोल, संबंध कोठे घेऊन जायचे हे चीनने ठरवावे

देश विदेश न्यूज ऑफ द डे

चीनने भारताच्या काही भागावर बांधकाम सुरू केले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासुन तणाव आहे. कधी चीन सैन्य हटवून समजदारीची भूमिका घेण्याचं नाटक करताना दिसत आहे तर कधी आरेरावीची भूमिका घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनस्थित भारतीय राजदुताने चीनचे कान पिळले आहेत.

द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेने आणू इच्छित आहेत हे चीनवर अवलंबून आहे हे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे. चीनने याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री म्हणाले की, दोन्ही देशांमधील सैन्य संघर्ष टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चीनने एलएसीवर त्वरित नवीन बांधकामे करणे थांबवावे.

वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विक्रम मिस्री म्हणाले की, त्यांना विश्वास आहे की, चीन या संदर्भात आपल्या जबाबदार्‍या समजून घेईल आणि एलएसीवरील तणाव कमी करेल आणि तेथून माघार घेण्याची प्रक्रिया सुरू करेल. ते म्हणाले की, चीनने सीमा ओलांडून भारताच्या सीमेत जाण्याची बेकायदेशीर कृती त्वरित रोखली पाहिजे.

Tagged