बीडला मिळाले नवे जिल्हा माहिती अधिकारी

न्यूज ऑफ द डे बीड

संप्रदा बीडकर यांची सांगली येथे बदली

बीड : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (दि.३०) काढले आहेत.

रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रशांत दैठणकर यांची बीडला जिल्हा माहिती अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहेत. तर बीड येथील संप्रदा बीडकर यांची सांगली जिल्हा माहिती कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सुट्टीवर असताना माहिती अधिकारी किरण वाघ यांनी यशस्वीपणे पदभार सांभाळला. दरम्यान, तोकड्या मनुष्यबळावर मात करून कामकाज करतानाच प्रलंबित जाहिरात बिलांचा तिढा सोडविणे, रखडलेले अधिस्वीकृतीचे प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान नूतन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्यासमोर असणार आहे.

Tagged