राष्ट्रवादीत मोठी फूट; अजित पवारांच्या शपथविधीची तयारी!

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


राज्याच्या राजकारणात भूकंप
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शपथ विधीची तयारी सुरू आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यात अजित पवार यांच्यासोबत नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील जाणार आहे. राजभवनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांची उपस्थिती आहे.

अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत. मंत्री पदामध्ये धनंजय मुंडे यांचीही वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.