कोरोना संसर्ग आला आटोक्यात
बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) कोरोनाचे २४३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे स्पष्ट होते.
जिल्ह्यातून शुक्रवारी ३९५८ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.५) प्राप्त झाले, त्यामध्ये २४३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३७१५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३८, अंबाजोगाई १६, आष्टी ३९, धारूर २०, गेवराई १४, केज २९, माजलगाव २९, परळी ४, पाटोदा ३४, शिरूर १० तर वडवणी तालुक्यात १० रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्याचे स्पष्ट होते.