रामगड झाला पोरका; महंत लक्ष्मण महाराज यांना देवाज्ञा

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीड : तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती हभप महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांना मंगळवारी (दि.30) सकाळी 10 च्या सुमारास देवाज्ञा झाली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हभप लक्ष्मण महाराज हे मागील काही दिवसापासून आजारी होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाने रामगड पोरका झाला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. रामगड हा थोरला गड म्हणून ओळखला जातो. या गडास श्रीराम प्रभूंचे पाय लागले होते. मठाधिपती लक्ष्मण महाराज यांनी गडाच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले. या घटनेने भविकांवर शोककळा पसरली आहे.

Tagged