gavathi pistal

गावठी पिस्टल बाळगणार्‍या तरुणास एलसीबीने पकडले

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : गावठी पिस्टल घेवून जालना रोड परिसरात एक तरुण फिरत असल्याची माहिती सोमवारी (दि.20) स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेवून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले.

संभाजी दादाहरी जोगदंड (वय 32 रा.भक्ती कंट्रक्शन बीड) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील जालना रोड परिसरात पिस्टल घेऊन फिरत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सरील पिस्टल हे पाटोदा येथील आनंद दत्तात्रय नागथई याकडून घेतले असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्यासही ताब्यात घेतले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत, एलसीबीचे पोनि.भरत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.विजय गोसावी, भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, अन्वर शेख, अतुल हराळे यांनी केली.

Tagged