परळीतील पूर्णवेळ संचारबंदी शिथिल; 13 भागातील कंटेनमेंट झोन कायम

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे परळी

परळी : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी curfew शिथिल करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी आज (दि.20) घेतला आहे. परंतु 13 भागातील कंटेनमेंट झोन containment zone मात्र कायम राहतील असे आदेशात म्हटले आहे.

  जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात म्हटल्याप्रमाणे, पूर्वीच्या आदेशानुसार 31 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. परंतु कोरोनाचे मीटर सुरु आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी आता संपूर्ण शहरातील संचारबंदी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला. त्यानुसार शहरात रुग्ण आढळलेल्या 13 कॉलनीतील कंटेनमेंट झोन मात्र कायम असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, परळीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भागातील कंटेनमेंट झोन कायम

Tagged