सुषमा अंधारेंपासून विभक्त झालेले त्यांचे पती बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खेळी

केज : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे हे आज (दि.१३) बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. ही खेळी शिंदे गटाने केली असून अंधारे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संधीचं सोनं करत अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात छाप उमटवली. एवढेच नव्हे तर आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण विधानांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. त्यामुळेच त्यांची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाने आता खेळी केली असून अंधारे यांच्यापासून विभक्त असलेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे यांचा शिंदे गटात प्रवेश घेतला जात आहे. वाघमारे हे मुळचे आडस (ता.केज) येथील असून ते वकिली व्यवसाय करत होते. अनेक वर्षांपूर्वी अंधारे यांच्याशी काडीमोड झाला असल्याचे बोलले जाते. आता बाळासाहेबांचे शिवसेना पक्ष प्रवेशामुळे ते चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते. त्यांना शिंदे गटाकडून मोठं पद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.