आश्चर्य ना!नांदेडच्या दारुबंदी विभागाकडून राजुरीतील बनावट दारु कारखाना उद्धवस्त

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

बीडच्या दारुबंदी विभागाला कारवाईची भनक सुद्धा नाही

केशव कदम | बीड


दि.14 : तालुक्यातील नवगण राजुरी परिसरामध्ये असलेल्या बनावट दारुचा कारखाना नांदेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्धवस्त केला. ही कारवाई सोमवारी (दि.14) दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने अवैध दारु माफियांमध्ये खळबळ उडाली असून बीडच्या दारुबंदी विभागाला, पोलीसांना जे जमत नाही ते नांदेडच्या दारुबंदी विभागाने करुन दाखवले आहे.

आकाश जाधव असे आरोपीचे नाव आहे. आकाश जाधव हा बनावट दारु बनवून त्याची राज्यभरात विक्री करत होता. नांदेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने नांदेड येथे बनावट दारुचे 100 बॉक्स जप्त केले. त्यानंतर आकाश जाधव याची कसून चौकशी केली. त्यावर त्याने बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे बनावट दारुचा कारखाना असल्याची माहिती दिली. त्यावरुन सोमवारी (दि.14) दुपारी राजुरी येथील बनावट दारुच्या कारखान्यावर नांदेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारला. येथून बनावट दारुचे साहित्य, मशनरी, पुठ्ठे असा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल घेवून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक नांदेडला रवाना झाले आहे.


शिदोड पसिरातील बनावट
दारु कारखान्याशी कनेक्शन

काही दिवसापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने बीड तालुक्यातील शिदोड परिसरात बनावट दारु कारखान्यावर कारवाई केली होती. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीसांनी तपासाचे चक्रे गतीमान करत बनावट दारु तयार करणारे, त्यासाठी साहित्य पुरवणारे व दारुची विक्री करणारे अशी पूर्ण साखळीच पकडली होती. नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेला आरोपी हा शिदोड येथील आरोपींचा जवळचा नातेवाईक आहे. सर्वांच्या संगनमतानेच कारखाने चालत असल्याची माहिती आहे.

दारु माफिया रडारवर
राजुरी परिसरात टाकलेल्या छाप्यात नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाला फक्त साहित्य मिळाले आहे. परंतु अद्याप अटक कुणालाही झालेली नाही. या कारखान्यामध्ये आकश जाधवला सहकार्य करणार्‍या सर्वांना ताब्यात घेतले जाणार आहे. त्यामुळे या कारखाना संबंधित असलेले दारु माफिया नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडावर आहेत.


एकास ताब्यात घेतले असून कारखाना उद्ववस्त केलेला आहे. तपास सुरु असल्यामुळे आरोपींची नावे सांगता येणार नाहीत. मोठी साखळी असल्याचे आमच्या निदर्शनास आले असून त्या दिशेने तपास सुरु आहे.
-अनिल पिकले
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पदन शुल्क विभाग नांदेड

Tagged