ACB TRAP

पाटोदा न.प.चे मुख्याधिकार्‍यासह चालक एसीबीच्या जाळ्यात

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

कारवाईने जिल्ह्यात खळबळ
  बीड : पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी व त्यांच्या चालकाला साठ हजार रुपयांची लाच घेतांन रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी केली.

तक्रारदाराचे नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील बील काढण्यासाठी पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले, यांनी लाचेची मागणील केली होती. सोमवारी सांयकाळी मुख्याधिकारी भोसले व चालक प्रदिप वाघ यांना साठ हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टिमने केली आहे.

Tagged