चीन बरोबरच आता पाकिस्तानची डोकेदुखी… सीमेवरील गोळीबारात एक भारतीय जवान शहिद

देश विदेश न्यूज ऑफ द डे

दि.22 ः एकीकडे चीन भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून, जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे अशी माहिती एएनआयने दिली आहे.

कृष्णा घाटीत पहाटे साडे तीन वाजता तर नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्यांना चोख उत्तर देत आहे. दरम्यान गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल आनंद यांनी दिली आहे.


Tagged