आयपीएस पंकज कुमावत यांचा छापा; 22 जुगारी ताब्यात

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

बीड दि.16 : सहय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार घेतल्यापासून गुटखा, जुगार, दारु, वाळू अशा विविध अवैध धंद्यांवर कारवाया धडाका सुरुच आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गुरुवारी (दि.16) दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे मारले. यावेळी 22 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 7 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिरसाळा परिसरामध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना कुंडीबा आरसुळे, जीवन मुळे, नवनाथ कदम, राजेंद्र मुसळे, विलास गायकवाड, पांडूरंग गुट्टे, मोहम्मद शेख, महादेव गडदे, सुभाष केकान, महादेव सांगळे, असेफ पठाण, पांडूरंग काळे, गोविंद कदम, दत्तात्रय अंभुरे, बाळकृष्ण गव्हाणे, शेख अब्दुल, शेख शफीक, अशोक नायबळ, ओंकार मुठाळ, प्रकाश पौळ, संतोष कदम, शामराव चव्हाण, धम्मानंद किरवले, सुधाकार दातार, सय्यद चाँद यांच्यांवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवायामुळे अवैध धंदे चालकांची धांदल उडाली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपनिरीक्षक कुलकर्णी, पोह.बालाजी दराडे, पोह.बांगर, पोना.भंडाणे, पोना.वंजारे, शेंडगे, पोना.दिलीप गित्ते, शेख, महादेव बहिरवाळ यांनी ही कारवाई केली.

Tagged