anil deshmukh, parambir sing

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा नोंद

क्राईम महाराष्ट्र

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणार्‍या घरांवर सीबीआयने छापेमारी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. वरळी येथील सुखदा इमारतीत अनिल देशमुख यांचे घर आहे, त्या ठिकाणीही छापा घालण्यात आला आहेअँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरन हत्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक (निलंबित) सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारनं पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्यावर ठपका ठेवून त्यांचीही या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकार्‍यांना खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. त्या संबंधीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे पुरावेही त्यांनी दिले होते. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर परत एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Tagged