नामलागाव येथे आईल मिलला आग; 90 लाखाचे नुकसान

बीड

नामलागाव येथे आईल मिलला आग; 90 लाखाचे नुकसान
बीड दि. 24 : बीड तालुक्यातील नामलागाव रोडवरील पीएस ऑईल इंडस्ट्रीज मिल ला शॉटसर्किटने शनिवारी (दि.24) सकाळी आग लागली. या आगीत पेंड आणि सरकी व मशिनरी जाळून खाक झाल्या आहेत. अंदाजे 90 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिलचे मालक यांनी दिली. अजय घोडके व श्यामसुंदर चरखा अशी मालकाची नावे आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आली आहे.