जिल्ह्यात संचारबंदी शिथिल; जमावबंदीकायम तर इंटरनेटची सुविधा राहणार बंद!

बीड

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचे आदेश
बीड : हिंसक आंदोलनामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आज 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी शिथिल करण्यात येणार असून जमावबंदी मात्र पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय यासह इतर अस्थापना सुरू राहणार आहेत. परंतु पुढील काही काळापर्यंत इंटरनेट सुविधा मात्र बंदच राहणार असल्याचे बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी सांगितले. तसेच सर्वांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Tagged