निष्पाप लोकांवर अन्याय नको; मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मागणी!

बीड


बीड दि. 1 : बीडमध्ये झालेल्या दंगलीत आमच्याही परिचयाचे नसलेले लोक जमावात होते. यामध्ये बीड जिल्ह्याचे बाहेरून आलेले असावेत. त्यांनीच ही दंगल पेटवली असावी. दंगलीनंतर व्यवसायिक, मजूर, आदी सर्वसामान्य लोक घरी जाताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये आले आहेत, अशा निष्पाप लोकांना आरोपी करण्यात आले आहे. हा अन्याय असून पोलिसांनी व्यवस्थित तपास करून ज्यांनी प्रत्यक्षात दंगल पेटवली त्यांनाच अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे केली. तसेच यातील मास्टरमाईंड शोधावा असेही म्हटले आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पूर्ण चौकशी करूनच कारवाई
होणार – आयजी डॉ.चव्हाण

आतापर्यंत 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून 100 जण ताब्यात घेतले आहेत. यामध्ये निष्पाप लोकांवर अन्याय केला जाणार नाही. सीसीटिव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण करूनच कारवाई केली जाणार आहे. तपासात जे निष्पन्न होतील त्यांच्यावरच कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.