ACB TRAP

डीसीसी बँक शिरुर शाखेतील तिघे एसीबीच्या जाळ्यात

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड शिरूर

बीड  : शिरुर येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील तिघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

      राजेंद्र कारभारी गुजर (वय 46, शिपाई), बाळू वामन जायभाये (वय 46, लिपीक), उद्धव विश्वनाथ जायभाये (वय 46 शाखाधिकारी) असे लाचखोरांची नावे आहेत. दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरूर शाखेतील अनुदान वाटपासाठी शेतकर्‍याकडे सहा हजारांची मागणी केली होती. सदरील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त होताच गुरुवारी (दि.2) दुपारी बँकेतील तिघांना सहा हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील, पोनि.रविंद्र परदेशी, पोना.अमोल बागलाने, सखाराम घोलाप, विजय बरकडे व चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

Tagged