nath maharaj palakhi

पंढरपुरात दहीहंडीची परंपरा खंडित नाथांची पालखी पैठणमध्ये आज दाखल होणार

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

चंद्रकांत अंबिलवादे/थेट वारीतून

दि.2 : पैठण येथून आषाढी वारी सोहळ्यासाठी मोजक्या मानकर्‍यांसह पंढरपूर येथे दाखल झालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज रात्री पैठणमध्ये दाखल होत आहे. परंपरेनुसार काल्याची दहीहंडी फोडून मगच पालखी पैठणकडे प्रस्थान ठेवत असते. मात्र प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे यंदा ही परंपरा खंडीत झाली आहे.


कोरोना साथीच्या अनुषंगाने पंढरपूर प्रशासनाने विविध मानाच्या पालखी सोहळ्यातील मोजक्या वारकर्‍यांनी आषाढी सोहळ्यामध्ये सर्व अटी नियम पालन करून सहभाग घेतला होता. गुरुवारी पहाटे विविध पालखीच्या मानकर्‍यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. दुपारी बारा वाजता पांडुरंगाला संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारनंतर पंढरपुर येथून संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत चांगवटेश्वर, अशा इतर पालखी सोहळ्याच्या प्रथेनुसार पांडुरंगाला नैवेद्य दाखविला.

दरम्यान कर्नाटकमधून पंढरपुरात विठ्ठल मुर्ती घेऊन येणारे नाथ महाराजांचे आजोबा ह.भ.प. भानुदास महाराज यांची पुण्यतिथी सोहळा पंढरपूरचे विठ्ठल मंदिरात साजरी केल्यानंतर विठ्ठल मंदीरातच नाथांचा काला दहीहंडी फोडण्यात येऊन पंढरपूर येथील आषाढी सोहळ्याची सांगता करण्यात येते. मात्र पंढरपूर प्रशासनाने व विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीने यंदा आषाढी वारीचा काला दहीहंडी उत्सव साजरा न करून दिल्यामुळे पंढरपूर मध्ये आलेल्या विविध संतांच्या पालखी सोहळ्याला आपल्या गावाकडे परतावे लागले आहे. त्यानुसार नाथांची पालखीने थोड्यावेळात पैठणकडे प्रस्थान ठेवले आहे.

नाथांच्या पालखीकडून पांडुरंगाला नैवेद्य दाखविताना
पांडुरंगाला नैवैद्य घेऊन जाताना…
Tagged