औरंगाबादचं कोरोनाचक्र थांबेना, बजाज कंपनीतील 79 कर्मचार्‍यांना कोरोना

न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

औरंगाबादः राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. राज्यात काल दिवसभरात 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबाद येथे कोरोनाचा हॉटस्पॉट निर्माण झाल्याचं चिन्ह आहे.

औरंगाबादमध्ये वाळूज येथे अनेक औद्योगिक कारखाने आहेत. याच भागातील बजाज कंपनीत 79 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बजाजकडून दोन दिवस कंपनी बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी कंपनी परिसर बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दोन कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.

Tagged