maheboob shekh

शिरुर पोलीसात आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दिली फिर्याद
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्याबद्दल आ.गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस ठाण्यात आ.परळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेबुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांना 2017 मध्ये सरकारने पद्मविभूषण पुरस्कारोन सन्मानित केले. तसेच ते भारताचे संरक्षण मंत्री व कृषि मंत्री होते. भाजपचे आ.गोपीचंद पडळकर यांनी समाजासमाजामध्ये द्वेष भावना निर्माण होईल, सर्वांच्या भावना दुखवल्या जातील, बहुजन जनतेबद्दल आफवेचे विधान केले आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात आ.पडळकर यांच्यावर भारतीय दंड सहिता 1860 कलम 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोउपनि.मनोज बरुरे करत आहेत.

Tagged