महिलेचा भर रस्त्यावर खून!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

 साळेगाव दि.25 : धारदार शस्त्राने महिलेची खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे रविवारी (दि.25) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
     घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणाहून एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात पाठवले आहे. तसेच मयत महिलेसह जखमीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tagged