rummy, tirat, jugar

शहर ठाणेहद्दीत जुगार अड्ड्यावर छापा ; 14 जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.3 : शहरातील गुलजार पुरा येथील पत्र्याच्या रूममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (दि.1) रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी 14 जुगार्‍यांना तिर्रट खेळतांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 8 हजार 600 रूपयांची रोकड, 14 मोबाईल असा एकूण 51 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड शहर पोलीस ठाण्यात पोशि.सतिश हंगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुलजार पुरा येथील पत्र्याच्या बंद रूमध्ये सय्यद सादेक सय्यद इसाक (वय 19, रा.अजीजपुरा), शेख दाऊद शेख इब्राहिम (वय 28, रा.अजीजपुरा), शेख निसार शेख करीम (वय 25, रा.अजीजपुरा), नौशाद कुरेशी जमाल कुरेशी (वय 30, रा.मोमीनपुरा), मोहंमद इब्राहिम मोहंमद अन्वर (वय 45, रा.जुना बाजार), नुशीर खान मोहमंद खान (वय 28, रा.खासबाग), शेख आमेर शेख नजीर (वय 24, रा.कागदीवेस), रिजवान शेख खुर्शीद हुसैन (वय 32, रा.झमझम कॉलनी), पठाण फिरोज खान दिलावर खान (वय 33, रा.शहेंशाहनगर), शेख आवेज शेख अलीम (वय 20, रा.अजीज पुरा), मोमीन शेख युसुफ शेख (वय 32, रा.खासबाग), अमजद खान यासीन खान (वय 36, रा.गुलजार पुरा), शेख कलीम शेख सलीम (वय 35, रा.गुलजारपुरा), सय्यद फेरोज सय्यद युसुफ (वय 34, रा.अजीजपुरा) हे 14 जण पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना आढळून आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोना.भारती हे करीत आहेत.

Tagged