कंटेनरची दुचाकीस धडक, एकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव :  भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तेलगाव ते दिंद्रुड परिसरातील भोपा जिनिंगसमोर गुरुवारी (दि.27) सायंकाळच्या सुमारास घडला. 

     सत्यभान गंगाधर गवळी (वय 32 रा.भोपा) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन (एमएच-44 जे.9486) जात असताना भरधाव आलेल्या कंटेनरने (डीएन-09 एस-9705) जोराची धडक दिली. यामध्ये सत्यभान हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Tagged