युवासेनेचे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित

न्यूज ऑफ द डे बीड

युवासेना जिल्हाप्रमुख शुभम डाके यांची माहिती

बीड : राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. याची युवासैनिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम डाके यांनी केले आहे.

  युवासेनेचे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन झंझावात हे नाशिक येथे दि. 8 व 9 जानेवारी 2022 रोजी आयोजित केले होते. याअनुषंगाने जिल्ह्यातील शेकडो युवासैनिकांसह पदाधिकारी अधिवेशनास जाणार होते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात वाढणारा ओमायक्रॉनचा प्रभाव आणि वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, तरुणांच्या व नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याच्या दृष्टीने युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार सदर अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. युवासेनेच्या या अधिवेशनाची पुढील तारीख राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी कळविले आहे. याची पदाधिकारी, युवासैनिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख शुभम डाके यांनी केले आहे.

 

Tagged