अशोक गलांडे, सिरसाळा
सलग तीन दिवसापासून ढगफुटीसदर्ष पाऊस होत असून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. ओढे,नाल्या,नदी दुथडी भरून वाहत आहेत. सिरसाळा मोहा अंबाजोगाई रस्त्यांवरील कांन्नापूर येथील गव्हाडा वड्यावर पाण्याने रुद्र रुप धारण केले असून या ओढ्यात एक चारचाकी पीक उप वाहून गेले असून यात तीन जन अडकले होते त्यापैकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून एक जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुढे जावून अडकलेल्या पीकउप ला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. राईस अन्सरभाई अत्तार वय 35 असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे